बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 

POST-[ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 'ब' वर्ग ]

शैक्षणिक अर्हता

पदनाम - कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाकरिताची शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे.

1) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता 38 वर्षे मागासवर्गीय उमेदवारांकरीता 43 वर्षे असावे.

2) उमेदवाराने एस.एस.सी वा समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षांची स्थापत्य वा कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील वा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मधील पदविका संपादित केलेली असावी.

3) उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला  मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

निवडीचे निकष

(i) सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या अर्हता/अटी/शर्ती पूर्ण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची ऑन लाईन परीक्षा घेण्यात येईल. सर्व चाचण्या इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील. प्रत्येक प्रश्न एक मार्काचा असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा करण्यात येतील. सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहीत आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.

(ii) कनिष्ठ अभियंता या पदासाठी पात्र होण्याकरीता उमेदवारास ऑनलाइन परीक्षेत किमान 50% गुण मिळणे आवश्यक आहे.

(iii) दोन किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान झाल्यास उमेदवारांच्या प्राधान्य क्रमाकरिता खाली दिलेले निकष क्रमवारीनुसार विचारात घेण्यात येतील.

1. पदविका परीक्षेची टक्केवारी

2. पदविका उत्तीर्ण दिनांक

3. 10 वी परीक्षेची टक्केवारी

4. वरील निकष लागूनही उमेदवारांचा गुणवत्ताक्रम समान येत असल्यास, वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांचा क्रम वरती लागेल.

परीक्षेचे स्वरूप: ऑनलाईन परिक्षा

अ. क्र. चाचणी प्रश्नांची संख्या गुण वेळ
1 सामान्य ज्ञान 20 20 90 मिनिटे
2 बौद्धिक क्षमता 20 20
3 तांत्रिक ज्ञान 60 60

 

Please click on the below link to view the syllabus of BMC JE EXAM.

BMC JE EXAM SYLLABUS

 

View Cart (0)